IPL 2026: यंदा आयपीएलचा ‘ग्लॅमरस’ उद्घाटन सोहळा नसणार? ‘हे’ कारण आलं समोर

आयपीएल 2026 हंगामाच्या प्रारंभापूर्वी बीसीसीआयने उद्घाटन सोहळा आयोजित न करण्याचा निर्णय घेतला आहे.
IPL 2026: यंदा आयपीएलचा ‘ग्लॅमरस’ उद्घाटन सोहळा नसणार? ‘हे’ कारण आलं समोर

बंगळूर: इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामाच्या प्रारंभापूर्वी एक महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. 28 मार्च 2026 पासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन यंदा करण्यात येणार नसल्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणाऱ्या पहिल्या सामन्यापूर्वी नेहमीप्रमाणे कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम किंवा सेलिब्रेशन होणार नाही.

दरवर्षी आयपीएलच्या पहिल्या सामन्यापूर्वी भव्य उद्घाटन सोहळा आयोजित केला जातो. या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते, गायक आणि कलाकारांचे आकर्षक सादरीकरण कार्यक्रम पाहायला मिळतात. मात्र यंदा बीसीसीआयने हा सोहळा टाळण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामागे मागील वर्षी घडलेली दुर्दैवी घटना कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.

हेही वाचा: Anjali Damania on Parth Pawar : अंजली दमानियांचा जमीन घोटाळ्यावरून पार्थ पवारांवर पुन्हा निशाणा, आता थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारले प्रश्न

या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र त्या वेळी स्टेडियमबाहेर अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला होता.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने यंदाच्या उद्घाटन सोहळ्याला विराम देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या 11 जणांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पहिल्या सामन्यापूर्वी मौन पाळण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या स्मरणार्थ स्टेडियममध्ये 11 आसने कायमस्वरूपी रिकामी ठेवली जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.

दरम्यान, आयपीएल 2026 चा पहिला सामना 28 मार्च रोजी बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने येतील. मागील हंगामात पंजाब किंग्सला पराभूत करत पहिल्यांदाच विजेतेपद जिंकलेल्या बंगळूरचा संघ यंदा किताब राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे, तर सनरायझर्स हैदराबाद दुसरे विजेतेपद पटकावण्याच्या उद्देशाने स्पर्धेत उतरणार आहे. 

हेही वाचा: Free Railway Travel: शौर्यपदक विजेत्यांना केंद्र सरकारची मोठी भेट; आता आयुष्यभर करता येणार मोफत रेल्वे प्रवास

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version