देशासह जगभरात जागतिक महिला दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

देशासह जगभरात जागतिक महिला दिनानिमित्ताने विविध  कार्यक्रमाचे आयोजन

आज ८ मार्च, जागतिक महिला दिन. या महिला दिनाच्या निमित्ताने देशासह जगभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. तसेच महाराष्ट्रातही निर्भया मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. या मॅरेथॉनला सैराट फेम आर्ची म्हणजेच रिंकु राजगुरुची उपस्थिती होती.

दरम्यान आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनी ट्विटद्वारे जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच महिला दिनानिमित्ताने ट्विटद्वारे संदेश देखील दिला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटद्वारे महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भाजपच्या मनिषा चौधरी यांनी महिला दिनाच्या निमित्ताने ‘तुम्ही भार्या, भगिनी, दुहिता, कित्येक वीरांच्या माता, तुम्ही नवयुगाची प्रेरणा, या जगताच्या भाग्यविधाता’, असं ट्विट करतं महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनीही महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.

तु नारी, तु घे भरारी
व्यापुन टाक क्षितिजे सारी!

प्रत्येक क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमठवत, परिस्थितीला निर्धाराने सामोरे जात, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणाऱ्या माझ्या सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मनसेच्या शालिनीताई ठाकरे यांनीही महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडेलनवरुन महिला दिनानिमित्त एक खास ट्विट केलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version