Shivsena Eknath Shinde : 6 खासदारानंतर शिंदेंचा आणखी एक मास्टर प्लॅन तयार; ठाकरेंसमोर शिंदेंच्या शिवसेनेचं मोठं आव्हान

शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार फोडल्यानंतर शिंदे ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत.
Shivsena Eknath Shinde : 6 खासदारानंतर शिंदेंचा आणखी एक मास्टर प्लॅन तयार; ठाकरेंसमोर शिंदेंच्या शिवसेनेचं मोठं आव्हान

शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार फोडल्यानंतर शिंदे ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. मुंबईत आता शिंदेंच्या शिवसेनेचं नवीन “सेनाभवन” उभं राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून मुंबईत स्वतंत्र आणि भव्य ‘सेनाभवन' उभारण्याच्या हालचाली सुरू असून शिंदेंच्या शिवसेनेकडून जागांची शोधाशोध सुरू आहे.

शिंदेंच्या शिवसेनेचा विस्तार होताना दिसत आहे. मुंबईत पक्षाचे हक्काचे आणि स्वतंत्र मध्यवर्ती कार्यालय असावे, यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात येत असल्याचे म्हटलं जात आहे. त्यामुळे शिवसेना फुटीनंतर आता मुंबईत आणखी एक शिवसेना भवन उभे राहण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा- Minister George Kurian : केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी दिला राजीनामा; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुपूर्द, हे कारण आलं समोर
याचपार्श्वभूमिवर मुंबईत वांद्रे बीकेसी आणि दादर अशा दोन जागा पाहण्यात आल्या असून वांद्रे बीकेसीतील असून ही जागा उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री' निवासस्थानापासून काही अंतरावर असल्याचे सांगितले जात आहे. मराठी माणसाच्या हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेचे मुख्यालय हे दादरसारख्या मराठमोळ्या आणि शिवसेनेच्या परंपरेशी जोडलेल्या भागात असावे अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. दादरमधील जागेची चाचपणी करण्यात आली असून तेथील काही तांत्रिक  त्रुटी लक्षात घेऊन पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version