INDvsAUS,2nd ODI : ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला

INDvsAUS,2nd ODI : ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरी वनडे खेळण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आहे.

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला बॅटिंग करण्यास भाग पाडलं आहे.

ही दुसरी वनडे राजकोट येथे खेळण्यात येणार आहे. टीममध्ये ऋषभ पंतऐवजी केएस भरतचा बॅकअप कीपर म्हणून समावेश करण्यात आला आहे.

पंतला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यादरम्यान बॅटिंग करताना दुखापत झाली होती.

दुसऱ्या वनडेसाठी टीममध्ये २ बदल करण्यात आले आहेत.

टीममध्ये पंतच्या जागी मनिष पांडेला तर शार्दूल ठाकूरच्या जागी नवदीप सैनीला संधी देण्यात आली आहे.

दरम्यान पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्याने ३ मॅचच्या सीरिजमध्ये टीम इंडिया ०-१ ने पिछाडीवर आहे.

त्यामुळे सीरिजमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी टीम इंडियाला आजचा सामना जिंकणं आवश्यक असणार आहे.

टीम इंडिया : शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, नवदीप सैनी आणि जस्प्रीत बुमराह

टीम ऑस्ट्रेलिया : एरॉन फिंच (कॅप्टन), डेविड वॉर्नर, मार्नस लाबुशैन, स्टीव स्मिथ, एलेक्स कॅरी, एश्टन टर्नर, एश्टन अगर, पॅट कमिंस, मिचेल स्टार्क, केन रिचर्डसन आणि एडम झॅम्पा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version