रश्मी शुक्लांविरोधात आरोपपत्र

रश्मी शुक्लांविरोधात आरोपपत्र

पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधात फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलिसांनी ७०० पाणी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात २० शासकीय कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या जबाबांमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे ही जबाब नोंदवण्यात आले आहेत.

२०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत होते , तेव्हा शिवसेना खासदार संजय राऊत यांचा फोन ६० दिवस टॅप करण्यात आला होता. तर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा फोन ६७ दिवस टॅप केला गेला होता. या दोघांचे फोन टॅप करण्यासाठी एसआयडीकडून एसीएसच्या घरी पाठवलेल्या पत्रावर बनावट नावे नमूद करण्यात आली होती. याप्रकरणी, माजी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तर त्याविषयी आता मुंबई पोलिसांनी ७०० पाणी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version