गुजरात किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा

गुजरात किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा

बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका देशाला बसण्याची शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्र खवळला आहे. आता हे वादळ गुजरातच्या दिशेने वेगाने जात आहे. या चक्रीवादळामुळे जोरदार वारे वाहत आहेत. बिपरजॉय चक्रीवादळ ईशान्य आणि लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्रावर पोरबंदरच्या नैऋत्येस आहे. हे वादळ जाखाऊ बंदराच्या दक्षिण-नैऋत्येस ३६० किमी अंतरावर आहे. १५ जूनच्या संध्याकाळपर्यंत जखाऊ बंदराजवळ सौराष्ट्र आणि कच्छ ओलांडून ते कराचीत जाणार आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये अनेक ठिकाणी पावसाचा आणि जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १२ जून ते १६ पर्यंत पावसाची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version