समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे शुक्रवारी लोकार्पण

समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे शुक्रवारी लोकार्पण

मुंबई ते नागपूर या महत्वकांक्षी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे नागपूर शिर्डी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर आता २६ मे रोजी शिर्डी ते नाशिक या दुसऱ्या टप्प्यापर्यंतचा मार्ग खुला होणार आहे.

मुंबई ते नागपूर या ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे.नागपूर ते शिर्डी यापहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर समृद्धीच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होते. आता दुसऱ्या टप्प्यातील नाशिकमधील भरवीर पर्यंतचे काम पूर्ण झाले असून येत्या शुक्रवारी २६ मे रोजी शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन कार्यक्रम पार पडणार आहे. हा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर शिर्डी ते भरवीर अंतर अवघ्या ४० ते ४५ मिनिटांत पार करता येणार आहे.

मुंबई ते नागपूर या महत्वकांक्षी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे नागपूर शिर्डी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर आता शिर्डी ते नाशिक या दुसऱ्या टप्प्यापर्यंतचा मार्गखुला होणार आहे. या ट्प्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर नागपूरहून नाशिकपर्यंतचे अंतर केवळ सहा तासात कापता येणार आहे.२६ मे रोजी शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी अंतराचा आहे. त्यापैकी नागपूर ते शिर्डी असा ५०१ किमीचा टप्पा सुरू झाला आहे.

शिर्डी ते भिवंडी या टप्प्याचे काम अजूनही सुरू आहे. सिन्नर ते कसारा टप्प्यात १२ बोगदे आणि १६ छोटे पूल उभारावे लागणार आहेत. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला केला जाईल. हा टप्पा पूर्ण झाल्यावरच मुंबईकरांना समृद्धी महामार्गाचा पूर्ण लाभ घेता येईल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version