गरम पाण्याचा नळ तुटल्याने ४ विद्यार्थी भाजले, एकाची प्रकृती चिंताजनक

गरम पाण्याचा नळ तुटल्याने ४ विद्यार्थी भाजले, एकाची प्रकृती चिंताजनक

गरम पाण्याचा नळ तुटल्याने ४ विद्यार्थी भाजल्याचा प्रकार घडला आहे. अमरावती जिल्ह्यातील जुना धामणगाव येथील मुकुंदराव पवार मिल्ट्री स्कूल मधील हा प्रकार घडला आहे.

विद्यार्थी आंघोळीसाठी गेले असताना अचानकपणे गरम पाण्याचा नळ तुटला. हा नळ तुटल्याने ४ विद्यार्थी भाजले आहे.

यामध्ये ३ विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर चौथा विद्यार्थी हा जबर जखमी झाला आहे.

या गरम पाण्यामुळे ४२ टक्के भाजला आहे. प्रीत बराते असं या विद्यार्थ्यांच नाव आहे.

प्रीत बराते हा केवळ साडे सहा वर्षाचा मुलगा आहे. हा विद्यार्थी ४२ टक्के भाजला गेला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

सद्या धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान प्रीतची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला बोंडे हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

भाजलेली मूलं ही अल्पवयीन आहेत.

दरम्यान हा प्रकार कोणाच्या चुकीमुळे घडला याची चौकशी केली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version