Haribhau Rathod On Rahul Narvekar : "मला त्यांनी धमकी दिली" राहुल नार्वेकरांवर हरिभाऊ राठोड यांचा गंभीर आरोप

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Haribhau Rathod On Rahul Narvekar : "मला त्यांनी धमकी दिली" राहुल नार्वेकरांवर हरिभाऊ राठोड यांचा गंभीर आरोप

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलच व्हायरल झाला आहे. यानंतर  माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

हेही वाचा- Nagpur Kisan Gawande : भाजप आमदाराची मध्यस्थी; अखेर किसन गावंडेंनी उमेदवारी अर्ज घेतला मागे, म्हणाले…

यावेळी हरिभाऊ राठोड म्हणाले की, “नार्वेकर मला म्हणाले तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून कामं करुन घेता आणि आमच्याविरोधात अर्ज भरता. तुमचे सगळे प्रिव्हीलेज मी काढून घेईन. यावर मी त्यांना म्हणालो की, साहेब मला फाशीवर चढवू शकता. त्यावर ते म्हणाले की तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही माझ्यासोबत पंगा का घेताय? मी त्यांना म्हटले की मला माहीत आहे की तुम्हाला तुमच्या भावाला, बहिणीला आणि वाहिनीला उमेदवारी द्यायची आहे. यासाठी धमक्या देत आहेत. नार्वेकर 5 वाजेपर्यंत इथे होते, येरझाऱ्या मारत होते. मला त्यांनी धमकी दिली, सिक्युरिटी कोणी दिली तुम्हाला?तुम्ही संवैधानिक पदावर आहात, तुम्हाला शोभत नाही असं मी बोललो. बिनविरोध करायचं आहे यासाठी आम्हाला धमक्या देत होते. राहुल नार्वेकर संविधानिक पदावर आहेत, तरी ते असे वागले. गगराणी साहेबांना आम्ही हे सगळं सांगितलं. आम्ही रिपोर्ट मागवतो असं ते म्हणाले”.

“आमचे अर्ज त्यांनी घ्यायला पाहिजे, 12 लोकं आहेत. आम्ही सोडणार नाही त्यांना. स्क्रुटनी 31 ला होते, तर आधीच केली त्यांनी. लोकं 1-1:30 वाजता आलेत, त्यांची पहिली स्क्रुटनी होते, मात्र अर्ज स्वीकारणं लोकांचा हक्क आहे. मुख्यमंत्री याला जबाबदार आहेत, गगराणी देखील दोषी आहेत. पोलिसांनी जाऊ दिलं नाही ते देखील जबाबदार आहेत. आरओ यांनी पैसे भरुन घेतले आणि अर्ज घेतला नाही. सगळ्यांनी उशिरा एबी फॉर्म दिलेत. एबी फॉर्म कोणी उशिरा दिला नाही. आम्हाला 8-8 दिवस आधी मिळाले. आरओ निलंबित झाले पाहिजे. गगराणी यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आमचे फॉर्म घेतलेत, मग त्यांनी त्यांची प्रॉपर्टी आम्हाला का दिली?. सरकारची रिसिप्ट आहे आमच्याकडे. त्यांच्या अधिकाऱ्यांनी चेक केलेत. टोकन आम्हाला दिलेत. पण त्यांनी नाकारलं की टोकन आम्ही दिले नाहीत. अर्ज आम्ही विड्रो करणार नाही, आम्ही निवडणूक लढणार. नार्वेकर यांच्या भावाचा अर्ज जर बिनविरोध तर समजून जा यांनीच माघार घ्यायला लावली” असं हरिभाऊ राठोड म्हणाले. 

हेही वाचा- Marathi Sahitya Sammelan Satara : राज्यात फक्त मराठीची सक्ती राहणार; अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती
नेमकं प्रकरण काय ?
बृहन्मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. याचपार्श्वभूमिवर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी 30 डिसेंबर हा अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. दरम्यान राहुल नार्वेकर यांच्या उपस्थित कुलाबा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 225, 226 आणि 227 साठी नार्वेकरांचे बंधू मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षदा नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडली. त्यानंतर काही उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून राहुल नार्वेकर धमकीच्या इशाऱ्यात बोलतानाचा व्हिडिओ शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियात पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये नार्वेकरांनी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांना देण्यात आलेली सुरक्षा काढून घेण्याचे आदेश दिल्याचे समोर आले. त्यामुळे वादाला फाटे फुटले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version