अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी ताब्यात घेण्याचे सुनील तटकरेंचे प्रयत्न असल्याचा आरोप अनेकदा आमदार रोहित पवार आणि शरद पवारांच्या गटातील नेत्यांनी केला आहे. त्यानंतर आता रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून राजकिय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यावर पक्षफोडीचे वेगवेगळे आरोप होत असताना रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांच्या बॅनरवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, स्वर्गीय अजित पवार यांच्यासह पक्षश्रेष्टींचे फोटो नसल्याचे समोर आले आहे.
मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदार संघांतील इंदापुर येथे माणगाव तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपिठावरील बॅनरवर खा. सुनिल तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह स्थानिक नेत्यांचे फोटो लावण्यात आले मात्र या बॅनरवर स्वर्गिय अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षश्रेष्टींचे फोटो लावण्यात आले नाहीत. रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून पक्षश्रेष्टी बेपत्ता होत असल्याने राजकिय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. या प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
हेही वाचा- Rupali Chakankar: भोंदू खरात प्रकरणात चाकणकर अडचणीत! SIT कडून समन्स, राजकारणात खळबळ
विकास लवांडे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “अजित दादांचा #NCP पक्ष ताब्यात घेण्याचे आधीपासूनचेच मनसुबे लपवून राहिलेले नाहीत. त्याची सुरुवात रायगड पासून झाली आहे. आदरणीय अजित दादांचा आणि उपमुख्यमंत्री @SunetraA_Pawar वहिनींचा पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमात बॅनरवर नाव किंवा फोटो सुद्धा नाही. याला कृतघ्नता म्हणतात. अजित दादांनी यांना पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर अनेक वर्षे ठेवल्यामुळे यांची राज्यपातळीवर प्रतिष्ठा वाढली. यांनी पक्षांतर्गत ओबीसी मराठा असा जातीयवाद सुद्धा वाढवलेला आहे जे अजितदादांना पटत नव्हते. @SunilTatkare तुमच्यात हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष प्रफुल पटेल यांना सोबत घेऊन काढावा. किंवा भाजपमध्ये जाण्यासाठी तुम्ही आधीपासूनच तयार आहात तर तुमची चार चौकडी घेऊन तुम्ही जावे. तुमच्या कृतघ्नतेचा तीव्र निषेध !” रायगडमधील राष्ट्रवादीच्या बॅनरवरून खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे
अजित दादांचा #NCP पक्ष ताब्यात घेण्याचे आधीपासूनचेच मनसुबे लपवून राहिलेले नाहीत. त्याची सुरुवात रायगड पासून झाली आहे. आदरणीय अजित दादांचा आणि उपमुख्यमंत्री @SunetraA_Pawar वहिनींचा पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमात बॅनरवर नाव किंवा फोटो सुद्धा नाही. याला कृतघ्नता म्हणतात. अजित दादांनी… pic.twitter.com/APTA5Txb8m — Vikas Lawande (@VikasLawande1) March 29, 2026
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.