दोपीडीतील सीएमईत सरावादरम्यान 2 जवानांचा मृत्यू, 5 जखमी

दोपीडीतील सीएमईत सरावादरम्यान 2 जवानांचा मृत्यू, 5 जखमी

पुण्यामधील दोपीडीतील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग ( College Of Military Engineering, Dapodi ) येथे पूल बांधतानाच्या सरावादरम्यान 2 जवानाचा मृत्यू झाला आहे. तर 5 जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

लोखंडी पूल बांधण्याचा सराव सुरु होता. या सरावादरम्यान पूल जवानांच्या अंगावर कोसळल्याने ही घटना घडली.

संजीवन पी के असे मृत जवानाचे नाव आहे. तर दुसऱ्या जवानाचे नाव समजू शकले नाही. गुरुवारी सकाळी ही घटना घडली.

अपघातानंतर संजीवन यांना खडकीतील लष्करी रुग्णालयात सकाळी 11.30 वाजता उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

मात्र तासाभरातच उपचारादरम्यान संजीवन यांचा मृत्यू झाला. तर जखमी जवानांवर उपचार सुरु आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version