कोरोना काळात नागरिकांनी खबरदारी घेत कोरोना चाचणीवर भर देण्याचे आवाहन प्रशासन करत आहे. मात्र, कोरोना चाचणीबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावतीमध्ये कोरोना चाचणी करायला गेलेल्या तरुणीच्या गुप्तांगाचा स्वॅब घेतल्याची घटना घडली आहे.
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील मोदी रुग्णालयामध्ये कोरोना चाचणीसाठी गेलेल्या तरुणीचा गुप्तांगाचा स्वॅब घेतल्याची घटना २८ जुलै २०२०रोजी घडली. या रुग्णालयामध्ये एका तरुणीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगून परत युवतीच्या गुप्तांगातून स्वॅब घेण्यात आला होता, त्यामुळे मोदी रुग्णालयाचा लॅब टेक्निशियन अलकेश अशोक देशमुख या आरोपी विरोधात बडनेरा पोलिसांनी बलात्कार व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. यामध्ये जिल्हा सत्र न्यायालयाने १२ साक्षीदाराचे बयान घेतले.
याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने १५ महिन्यानंतर निकाल देत आरोपी अलंकेश देशमुख ह्याला १० वर्ष सक्षम कारावास आणि १० हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसेच सरकारी पक्षाच्यावतीने, सरकारी वकील सुनील देशमुख यांनी प्रभावी बाजू मांडली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.