महाराष्ट्रातील पुराच्या बातम्या पाहतानाच धरणे भरल्याच्या आणि धरणातून पाणी सोडल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो. मात्र यामध्ये वापरले गेलेले क्युसेकसारखे शब्द, एककं समजून घेणं महत्त्वाचं आहे. क्युसेक, क्युमेक, पूर रेषा या गोष्टींबद्दल जाणून घ्या.
धरणातून सोडण्यात येणारं पाणी क्युसेकमध्ये मोजतात.
क्युसेक म्हणजे एक घनफूट पर सेकंद
एक क्युसेक पाणी म्हणजे सेंकदाला 28.31 लिटर पाणी सोडणं.
क्युसेकमध्ये पाणी घनफुटात मोजतात, क्युमेकमध्ये पाणी घनमीटर मध्ये मोजतात
एक क्युमेक- प्रती सेकंदाला 1000 लिटर्स पाणी सोडणे
धरणाची क्षमता टीएमसी मध्ये मोजली जाते
1000 दशलक्ष घनफूट म्हणजे 1 टीएमसी पाणी ( 1 अब्ज घनफूट )
धरणातून 30,000 क्युसेक वेगाने पाणी सोडलं असता त्या नदी पात्राची पाणीपातळी जेथे पोहचेल ती रेषा पांढरी रेषा (White Line) म्हणून ओळखली जाते.
धरणातून 60,000 क्युसेक वेगाने पाणी सोडलं जातं. पांढरी रेषा ओलांडून पाणी पुढे जातं. ती रेषा म्हणजे निळी रेषा (Blue Line)
अतिवृष्टीच्या परिस्थितीत धरणातून 1 लाख क्युसेक पाणी सोडलं जातं. निळी रेषा ओलांडून पाणी जिथे पोहचतं. त्याला लाल रेषा (Red Line) म्हणतात.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.