मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती शनिवारी भारतीय जनता पार्टीची बैठक होणार आहेत. भाजपाकडून तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे. दादर येथील वसंत स्मृती या भाजपाच्या मुंबई कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बैठकीला सुरूवात होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला पक्षातील सर्व विधानसभा आणि विधानपरिषदेचे आमदार उपस्थित राहणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.