Maharashtra Government Cancel Cabinet Meeting : अजित पवारांच्या निधनानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; मंत्रिमंडळ बैठक होणार नाही?

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Maharashtra Government Cancel Cabinet Meeting : अजित पवारांच्या निधनानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; मंत्रिमंडळ बैठक होणार नाही?

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपल्या कार्यकाळाची सुरुवात पवार कुटुंबाच्या परंपरेनुसार महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन करून केली. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, शपथविधीनंतरच्या पहिल्याच दौऱ्यासाठी सुनेत्रा पवार यांनी सातारा जिल्ह्याची निवड केली यानंतर आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सातारा दौऱ्यावर होत्या.

हेही वाचा- India-US Trade Deal : भारतासाठी खुशखबर! मोदींसोबतच्या चर्चेनंतर अमेरिकेनं हटवला भारतावरील टॅरिफ, आता फक्त ‘इतका’ कर भरावा लागणार

यावेळी त्यांनी अजितदादांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी विदीप जाधव यांच्या पत्नीला नोकरी देण्याचा शब्द दिला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दर मंगळवारी पार पडली जाणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आता सरकारने पुढे ढकलली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक या मंगळवारी न होता ती पुढील दिवसांत घेतली जाणार आहे. दरम्यान सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही नेते 9 फेब्रुवारी रोजी मंत्रालयात उपस्थित राहणार आहेत. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version