युद्धाचा भारतीय बाजारावर परिणाम

युद्धाचा भारतीय बाजारावर परिणाम

रशिया-युक्रेनमध्ये गेल्या १३ दिवासंपासून युद्ध सुरू आहे. रशियाकडून युक्रेनवर तीव्र लढाई सुरू आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली आहे. अशातच, या युद्धाचा परिणाम भारतीय बाजारावर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. कच्च्या तेलाचे भाव भडकल्याने त्याचा थेट परिणाम इतर वस्तूंच्या किंमतीवर होत आहे.

युद्धाचा कोणकोणत्या वस्तूंवर परिणाम होणार?

सूर्यफूल तेलाच्या आयातीला मोठा फटका.


इतर सर्व खाद्य तेलाच्या किंमतीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता.


पाम तेलाच्या किंमतीत २०२२ सालात ३५ टक्क्यांनी वाढ.


कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याने सोने आणि चांदीत मोठी गुंतवणूक.


गुंतवणुकीमुळे सोन्या चांदीचे भाव वधारले.


झिंक, निकेल, ॲल्युमिनियम आणि कॉपरच्या किंमतीत उच्चांकी वाढ.


पोटॅश आणि फॉस्फेटसारख्या खतांच्या किंमती वाढल्या.


जागतिक बाजारपेठात गहू, मका, सोयाबीन आणि तीळाच्या किंमतीत वाढ.


२०२२सालात कोणत्या वस्तूंमध्ये किती टक्के वाढ?

खाद्य तेल ३५ टक्के

सोने १० टक्के

चांदी १० टक्के

निकेल १३१ टक्के

ॲल्युमिनियम ३३ टक्के

झिंक १६ टक्के

कॉपर ६ टक्के

स्टील १२ टक्के

लीड ७ टक्के

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version