सिंधुदुर्ग किनारपट्टीवर बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम

बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका सर्वत्र घोंगावत आहे. सगळीकडेच समुद्राच्या लाटांना उधाण आले आहे. रहिवासी आणि पर्यटकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनार पट्टीवर जाणवत आहे. सध्या पाच ते सहा मीटर उंचीच्या लाटा किनारी धडकत आहेत. मात्र हौशी पर्यटक मात्र आपला जीव धोक्यात घालत आहेत. वेंगुर्ले बंदर किनारी काही विदेशी पर्यटक स्टंटबाजी करत होते. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने समुद्र किनारी पर्यटक असताना प्रशासन काळजी घेत नसल्याचे वृत्त प्रसारित केल्यानंतर त्याची दखल घेत पोलीस प्रशासनाने बंदर किनारी येथे स्टंटबाजी करणाऱ्या विदेशी पर्यटकांना सुचना दिल्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version