इलियानाने दिली गोड बातमी

इलियानाने दिली गोड बातमी

दाक्षिणात्य सिनेमे असो किंवा हिंदी सिनेमे सर्वत्र आपल्या अभिनयाची आणि सौंदर्याची जादू करणारी अभिनेत्री म्हणजे इलियाना डिक्रूझ. नुकतीच इलियानाने आपल्या चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. इलियानाने ती गरोदर असल्याची बातमी देत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने याबद्दलची माहिती दिली.

अभिनेत्री इलियाना डिक्रूझ हिने इन्स्टाग्रामवर लहान बाळाच्या ड्रेसचा फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत ‘.. आणि प्रवासाला सुरुवात’ असा मजकूर त्या ड्रेसवर लिहिण्यात आला आहे. तर दुसऱ्या फोटोत इलियानाच्या गळ्यात ‘मम्मा’ अशा अक्षरांचे एक पेंडंट पहायला मिळतंय. हे दोन्ही फोटो पोस्ट करत इलियानाने कॅप्शनमध्ये ‘लवकरच..’असं लिहिलंय.तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी तसेच इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

या पोस्टला इलियानाची आई समिरा डिक्रूझ यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहिलं,” लवकरच माझ्या नातवाचे आगमन होणार आहे त्यामुळे मी फारच उत्सुक आहे.” मात्र दुसरीकडे ही पोस्ट पाहून इलियानावर ‘लग्न कधी झालं’,‘बाळाचा होणारा पिता कोण आहे’,’हे दत्तक घेतलेलं बाळ आहे का? अशा बऱ्याच प्रश्नांचा भडीमार होताना देखील दिसत आहे.काही दिवसांपासून इलियाना अभिनेत्री कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेलला डेट करत असल्याची चर्चा होती. बऱ्याचदा ती विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्यासोबत एका पार्टीतही दिसली होती. त्यामुळे सोशल मीडियावर बऱ्याच चर्च्यांना उधाण आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version