ओमायक्रॉन विषाणूमुळे जगभरात चिंतेत वाढ झाली असून देशातही ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आता केंद्राने राज्य सरकारला सूचना दिल्या आहे. गरज भासल्यास रात्रीची संजारबंदी लागू करण्याची सूचना केंद्राने राज्यसरकारला दिली आहे.
ओमायक्रॉन हा व्हेरिएंट डेल्टाच्या तिप्पट संसर्गजन्य असून ओमायक्रॉन विषाणूला वेळीच आवर घालण्यासाठी राज्यांनी गरज भासली तर वॉर रुम्सची निर्मिती करून रात्रीची संचारबंदी लागू करावी, अशा सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना केल्या आहेत.
देशभरात ओमायक्रॉनबाधितांची संख्या २१६वर पोहोचली आहे. तर सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यामुळे खबरदारी घेत केंद्राने राज्यांना पत्र लिहिले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना काही सूचना केल्या आहेत. या सूचनांमध्ये राज्यांनी रात्रीची संचारबंदी लावणे, मोठ्या सभांबाबत दक्षता घेणे, लग्न आणि अंत्यसंस्कार यासाठी नागरिकांची संख्या मर्यादित ठेवणे यांसारखे नियम लागू करण्याच्या सूचना केंद्राकडून राज्य सरकारला करण्यात आल्या आहेत.
दिवसेंदिवस ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महाराष्ट्रात नाताळ सण आणि नववर्षाच्या पार्टी, उत्साहात निर्बंध घातले आहेत. तसेच लग्नसमारंभासह अनेक कार्यक्रमांसाठी २००पेक्षा जास्त व्यक्तींच्या उपस्थितींसाठी परवानगी आवश्यक असणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.