शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्याचे राजकारण खवळून निघालं आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोडकौतुक केले. एवढचं नव्हे तर जर ऑफर आली तर विचार करेल असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडवून निघाली होती. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत सध्या दोन गट तयार झाले असून नेत्यांमध्ये आपापसात मदभेद असल्याची माहिती समोर आली होती.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने प्रमाणे शरद पवार यांची राष्ट्रवादी देखील फुटणार का? अशा प्रश्नांना उधाण आलं होत. असं असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ऑफर आली तर विचार करू असे म्हटल्याने खळबळ उडाली. यानंतर आता राष्ट्रवादीचे खासदार आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतः त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला असून पुणे-नाशिक रेल्वेच्या प्रश्नावर मी उत्तर दिले होते. मी शरद पवारांसोबतच कायम राहणार असल्याचे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी अमोल कोल्हे म्हणाले की, “पुणे -नाशिक रेल्वे होण्यासाठी राजाभाऊ वाजे आणि अमोल कोल्हे भाजप सोबत गेले तर होऊ शकतो त्यावर माझं उत्तर होत. सुप्रिया सुळे ह्या आमच्या गटनेत्या आहे, आमचे सर्व खासदार एकत्र आहे, या चर्चा काय सुरू आहेत त्याची मला कल्पना नाही. संजय राऊत यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याचे मी आभार मानतो… मी कुठ ही जाणार नाही यावर मी मत व्यक्त केले आहे.. शरद पवार साहेब सांगतील ते धोरण बांधतील ते तोरण.. आम्ही सर्व आठ खासदार एकसंघ आणि सोबत असल्याचे खासदार कोल्हे यांनी ऑपरेशन तुतारी वर उत्तर दिलं आहे.”
“इन्फ्रा मॅन म्हणून देवेंद्र फडणवीस हे ओळखले जातात. 14 देशांमध्ये ज्या पद्धतीने हा प्रकल्प सुरू आहे तो आपल्याकडे का होऊ शकत नाही? हा माझा सवाल आहे. डबल इंजिन सरकार आहे राज्यात केंद्रात सरकार आहे त्यामुळे हा प्रकल्प व्हायला पाहिजे. नाशिक पुणे प्रकल्पाचा मार्गाने सर्वे झाला आहे त्याच मार्गाने व्हावा ही आमची भूमिका आहे ही आमची मागणी आहे. लोकशाहीमध्ये ज्यांनी आम्हाला ज्या बाजूने कौल दिला आहे, त्यांच्यासोबत त्यांच्या मतांचा असा अपमान करणे योग्य नाही… त्यामुळे विकास व्हायला पाहिजे, लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे, यासाठीच मायबाप जनता असते… त्यामुळे सरकारची जबाबदारी म्हणून तो निर्णय व्हायला आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. सरकारची जबाबदारी आहे आणि त्यात इन्फ्रा मॅन म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे त्यासाठी हा निर्णय होईल अशी आमची मनोमन भावना आहे. अजित दादांचे ते स्वप्न होतं आणि त्या साठी आम्ही देखील कटिबंध आहोत.”
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.