ICICI Bank Credit Card: BookMyShow वरील ‘बाय वन गेट वन’ ऑफरसाठी आता ‘ही’ अट; बँकेकडून क्रेडिट कार्ड युजर्सना मोठा दे धक्का! वाचा सविस्तर

या बदलांमुळे सर्वाधिक परिणाम Online Gaming Transactions वर होणार आहे.
ICICI Bank Credit Card: BookMyShow वरील ‘बाय वन गेट वन’ ऑफरसाठी आता ‘ही’ अट; बँकेकडून क्रेडिट कार्ड युजर्सना मोठा दे धक्का! वाचा सविस्तर

मुंबई : खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक ICICI Bank ने आपल्या सर्व रिटेल Credit Card ग्राहकांसाठी फीचर्स, शुल्क (Charges) आणि रिवॉर्ड स्ट्रक्चरमध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत. हे बदल टप्प्याटप्प्याने लागू होणार असून, बहुतांश नियम 15 जानेवारी 2026 पासून प्रभावी होतील. तर काही रिवॉर्ड मर्यादा (Reward Cap) आणि लाभांतील कपात 1 फेब्रुवारी 2026 पासून लागू केली जाणार आहे. या बदलांचा थेट परिणाम ग्राहकांच्या खर्च पद्धतीवर होणार असल्याने, सुधारित नियम काळजीपूर्वक समजून घेण्याचा सल्ला बँकेकडून देण्यात आला आहे.

या बदलांमुळे सर्वाधिक परिणाम Online Gaming Transactions वर होणार आहे. Dream11, Rummy Culture, Junglee Games, MPL यांसारख्या प्लॅटफॉर्मवर केल्या जाणाऱ्या डिपॉझिट किंवा व्यवहारांवर आता 2 टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. भविष्यात गेमिंगशी संबंधित नवीन Merchant Category Code (MCC) वरही हा चार्ज लागू केला जाऊ शकतो, अशी माहिती देण्यात आली आहे.

याशिवाय, Amazon Pay, Paytm, MobiKwik, Freecharge आणि OlaMoney यांसारख्या थर्ड पार्टी वॉलेटमध्ये 5000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम लोड केल्यास एक टक्का शुल्क आकारले जाईल. तसेच रेल्वे, बस बुकिंग आणि इतर हाय व्हॅल्यू ट्रॅव्हलशी संबंधित काही Transportation MCCs अंतर्गत 50000 रुपयांहून अधिक व्यवहारांवर एक टक्का सरचार्ज लागू होणार आहे.

हेही वाचा: Odisha Maoists Surrender : ओडिशा सरकारचे मोठे यश! बक्षिसाच्या रकमेत वाढ करताच 22 माओवाद्यांचे आत्मसमर्पण

1 फेब्रुवारी 2026 पासून ट्रान्सपोर्टेशन खर्चावर मासिक Reward Cap लागू केली जाणार आहे. Emeralde, Emeralde Private, Sapphiro आणि Rubyx कार्ड्ससाठी रिवॉर्ड फक्त 20000 रुपये प्रति महिना खर्चापर्यंतच मिळतील. Coral, Platinum, Manchester United, CSK यांसारख्या मिड टियर कार्ड्ससाठी ही मर्यादा 10000 रुपये प्रति महिना असेल. Emeralde Metal कार्डवर आता सरकारी सेवा, इंधन, भाडे, प्रॉपर्टी मॅनेजमेंट, कर भरणा आणि थर्ड पार्टी वॉलेट व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत.

मनोरंजनाशी संबंधित ऑफर्समध्येही नियम कडक करण्यात आले आहेत. BookMyShow वरील लोकप्रिय Buy One Get One ऑफर आता अटींशिवाय मिळणार नाही. हा ऑफर मिळवण्यासाठी मागील कॅलेंडर क्वार्टरमध्ये किमान 25000 रुपये खर्च करणे आवश्यक असेल. तसेच Instant Platinum Card वर हीऑफर फेब्रुवारी 2026 पासून पूर्णपणे बंद केला जाणार आहे.

प्रीमियम कार्डधारकांसाठीही अतिरिक्त खर्च वाढणार आहे. Emeralde Series म्हणजे Metal, Private आणि PVC कार्ड्सवर Dynamic Currency Conversion (DCC) शुल्क वाढवून 2 टक्के करण्यात आले आहे. Emeralde Metal च्या नवीन Add on Card साठी 3500 रुपयांचे एकरकमी शुल्क आकारले जाईल. इतर कार्ड्ससाठी DCC Markup मध्ये बदल करण्यात आला असून, MakeMyTrip Travel वर 0.99 टक्के, Times Black वर 1.49 टक्के, Amazon Pay ICICI Card वर 1.99 टक्के, तर बहुतांश इतर कार्ड्सवर हे शुल्क 3.5 टक्क्यांपर्यंत असू शकते.

एकूणच, ICICI Bank च्या या बदलांमुळे क्रेडिट कार्ड वापरण्याचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या खर्चाच्या सवयी, रिवॉर्ड फायदे आणि शुल्क यांचा आढावा घेऊन पुढील आर्थिक नियोजन करणे गरजेचे ठरणार आहे.

हेही वाचा: Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड; वाल्मिक कराडसह आरोपींचा खटला लांबणीवर टाकण्याचा डाव अ‍ॅड. निकमांनी उधळला

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version