पाकिस्तानच्या ‘या’ तीन खेळाडूंकडून भारताला धोका

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष.पाकिस्तानला हरवल्यास भारताचा उपांत्य फेरीत जाण्याचा मार्ग होणार सोपा.
पाकिस्तानच्या ‘या’ तीन खेळाडूंकडून भारताला धोका

मुंबई: भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यासाठी प्रेक्षक आतूरतेने  वाट बघत असतात. हे दोन्ही संघ आयसीसी स्पर्धांशिवाय सहसा आमने-सामने येत नाहीत. 
या दोन्ही संघांमध्ये एकापेक्षा एक धुवाधार खेळाडू आहेत. भारताला जर हा सामना जिंकायचा असेल तर 'या' पाकिस्तानच्या खेळाडूंपासून सावध राहिले पाहिजे. 
'पाकिस्तान भारताला हरवणार' IITian बाबाचं भाकीत

1)  शाहीन शाह आफ्रिदी: 
पाकिस्तान संघाच्या गोलंदाजीचा पाठीचा कणा म्हणजे शाहीन शाह आफ्रिदी. ६ फूट उंची, चेंडूला दोन्ही दिशेने वाळवण्याची कला आणि सुसाट वेग या सर्व गोष्टी शाहीन शाह आफ्रिदीच्या ताफ्यात आहेत. तसेच, २०२१ च्या टी २० वर्ल्ड कपमध्ये भारताच्या रोहित शर्मा विराट कोहली आणि केएल राहुलला बाद करून तो सामना पाकिस्तानला जिंकण्यास मदत केली होती.  शाहीन नवीन चेंडूने भारताला त्रास देऊ शकतो. डाव्या हाताचे वेगवान गोलंदाज हे भारताच्या फलंदाजांची कमजोरी मानली जाते. रोहित शर्मा असो किंवा विराट कोहली अनेकदा डाव्या हातच्या वेगवान गोलंदाजांना बाद होताना दिसले आहेत. जर भारताला सामना जिंकायचा असेल तर शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीला योग्य रीतीने खेळून काढली पाहिजे. 

2) नसीम शाह: 
नसीम शाह पाकिस्तानचा २२ वर्षाचा वेगवान गोलंदाज आहे जो शाहीन शाह आफ्रिदी पेक्षा जलद गोलंदाजी करतो. त्याचा आऊट स्विंग भारतासाठी घातक ठरू शकतो. गती आणि आऊट स्विंगसोबत नसीमकडे अचूक टप्पादेखील आहे. एकाच टप्प्यावर सतत गोलंदाजी कारण्याची त्याची क्षमता भारतीय फलंदाजांना अडचणीत आणू शकते. २०२४ टी २० वर्ल्ड कपमध्ये नसीम शाहने विराट कोहलीला बाद केलं होतं. 

3) बाबर आझम: 
बाबर आझम पाकिस्तानचा सर्वश्रेष्ठ फलंदाज मानला जातो. विराट कोहलीसोबत त्याची सतत तुलनादेखील होतं असते. बाबर आझम एक शैलीदार फलंदाज आहे. डाव धरून ठेवण्याची बाबरकडे क्षमता आहे. थर्डमॅनपासून ते स्क्वेअर लेग पर्यंत सगळीकडे फटके खेळू शकतो. भारतीय गोलंदाजांना बाबर त्रास देऊ शकतो. बाबरला जर लवकर बाद केलं तर सामना भारताच्या दिशेने वळू शकतो. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version