‘अपक्ष उमेदवाराल पाठींबा देणार नाही’

‘अपक्ष उमेदवाराल पाठींबा देणार नाही’

राज्यसभेची अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या संभाजीराजे छत्रपतींनी ४२ मतांची तजवीज केली का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत हे सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राऊत यांनी म्हटले की, संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याच जाहीर केले आहे. आम्हाला शिवसेनेला उमेदवार निवडून आणायचा आहे. राज्यसभेतील संख्याबळ वाढवायचे आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही अपक्षाला पाठिंबा देणार नाही. शिवसेना राज्यसभेच्या दोन्ही जागा लढवणार आहे. शिवसेनेनं २ जागा लढवणं अपराध नाही. दोन्ही जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून येणार, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

त्यामुळे आम्ही संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यास सांगितले. संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत. शिवसेनेच्या निमंत्रणाकडे संभाजीराजे पाठ फिरवली असून आज पहाटेच ते कोल्हापूरकडे रवाना झाले. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेना प्रवेशाची अट संभाजीराजे यांना घालण्यात आली आहे. मात्र ही अट संभाजीराजेंना मान्य नसल्याचे सांगण्यात येत आहे.

संजय राऊत पुढे असेही म्हणाले त्यांनी संभाजीराजेंना सांगितलं की, तुम्ही शिवसेने प्रवेश करा आणि शिवसेनेकडून राज्यसभेत जा. तुम्ही एक पाऊल पुढे या, आम्ही दोन पावलं मागे जाऊ, तुम्ही छत्रपती आहात, असं ते म्हणाले.  संजय राऊत पुढे म्हणाले की, ही माझी मन की बात नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मन की बात आहे. तसेच संभाजीराजेंना आमचा विरोध नाही. मात्र राज्यसभेत शिवसेनेचा एक खासदार वाढवणं आम्हाला गरजेचं आहे, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version