मी राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही – प्रफुल्ल पटेल

मी राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही – प्रफुल्ल पटेल

महाराष्ट्राच्या राजकारणात नवनवीन घडामोडी सातत्याने सुरु आहेत. मंगळवारी शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबत घोषणा केली. या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात नवं वादळ सुरु झालं आहे. यावर विविध प्रतिक्रिया येत असताना प्रफुल्ल पटेल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबतचा अंतिम निर्णय पुढील दोन दिवसात देण्यात येईल असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. परंतु, याविषयी ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादीची कुठलीही बैठक झाली नाहीये. त्यामुळे, अद्यापही या संदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ‘मी राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही’ अशी स्पष्ट भूमिका प्रफुल्ल पटेल यांनी भूमिका व्यक्त केली आहे.

सदर सुरु असलेल्या या प्रकरणात एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा शरद पवारांनंतर आता सुप्रिया सुळेंकडे जाणार असल्याचा अंदाज अनेकांकडून व्यक्त होत आहे. सुप्रिया सुळे यांना अध्यक्षपदाची नवी जबाबदारी मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात असतानाच आता शरद पवारांनी दिलेल्या निवृत्तीच्या निर्णयावर विचार करायला वेळ द्या असं शरद पवारांनी अजित पवार यांच्याकडे सूचक वक्तव्य केल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version