मी… मी असं कधी म्हणालो… पवारांची कोलांटी उडी

मी… मी असं कधी म्हणालो… पवारांची कोलांटी उडी

सातारा, २५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मी… मी असं कधी म्हणालो… असा प्रश्न उपस्थित करत अवघ्या सहा तासांत शरद पवारांनी आधीच्या वक्तव्यापासून फारकत घेतली.

याआधी अजित पवार यांच्या विरोधात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती सुप्रिया सुळे गटाने दिली. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही आणि अजित पवार आमचे नेते आहेत असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेत पत्रकारांनी प्रश्न विचारले त्यावेळी शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचे जाहीरपणे समर्थन केले. यानंतर अवघ्या सहा तासांत पवारांनी कोलांटी उडी मारली. मी… मी असं कधी म्हणालो… असा उलटा प्रश्नच शरद पवार यांनी पत्रकारांना विचारला.

सगळ्यांना वेगळा विचार करण्याचा अधिकार आहे…. वेगळा विचार केला म्हणजे फूट पडली असे म्हणण्याची गरज नाही… अशी वक्तव्ये करणाऱ्या शरद पवारांनी दुपारी एकदम दुसऱ्या टोकाची भूमिका घेतली. अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे भाऊबहीण आहेत. यामुळे सुप्रिया सुळे अजित पवार यांना नेता म्हणू शकतात. पण मी असं म्हणालो नाही अशी कोलांटी उडी शरद पवार यांनी मारली.

या सगळ्यावर राजकीय वर्तुळातून विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटवण्यात आल्या आहे. शरद पवार यांच्या भूमिकेमुळे संपूर्ण महाराष्ट्र संभ्रमात आहे. म्हणूनच आमदार आमदार बच्चू कडू यांनी खोचक टीका केली आहे. ‘काका – पुतण्या मिळून महाराष्ट्राला वेड्यात काढताय’ असं बच्चू कडूं म्हणाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version