‘मी असमर्थ असल्याचे कधीही म्हटले नाही’ – डॉ. रविंद्र भोयर

‘मी असमर्थ असल्याचे कधीही म्हटले नाही’ – डॉ. रविंद्र भोयर

नागपूर स्थानिक स्वराज्य  संस्थेच्या निवडणूकीसाठी डॉ. रविंद्र भोयर यांच्या ऐवजी मंगेश देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावर डॉ. रविंद्र भोयर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचा उमेदवार असून मी असमर्थ आहे असे कधीही म्हटले नसल्याचे,  डॉ. रविंद्र भोयर यांनी सांगितले आहे.

मी प्रदेशाध्यक्षांचा उमेदवार नव्हतो, काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीचा मी उमेदवार असल्याचे डॉ. रविंद्र भोयर यांनी  सांगितले आहे. तसचे रविंद्र भोयर निवडणूक लढवण्यासाठी असमर्थ असल्याचे त्यांनी म्हटले असल्याचा आरोप काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून करण्यात आला. मात्र मी असमर्थ आहे असे कधीही म्हटले नाही, पक्ष जो निर्णय घेईल त्यावर मी सहमत असल्याचे डॉ. रविंद्र भोयर यांनी स्पष्ट केले आहे.

मी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून पक्षाची जी भूमिका आहे त्यासोबत मी आहे तसेच जे माझ्या संपर्कात होते ते आता कुणाला मतदान करतील हे मला विचारण्यापेक्षा ज्यांनी हा घाट घातला आहे, तेच याचे उत्तर देतील. त्यामुळे भाजपला धडा शिकवण्याचे आवाहन डॉ. रविंद्र भोयर यांनी मतदारांना केले आहे. तसेच मतदान करताना मतदारांनी सद्सदद्विवेक बुद्धीचा वापर करावा असेही ते म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version