CM Devendra Fadanvis : "अपघाताच्या आदल्या दिवशी दादांशी तासभर गप्पा मारल्या", देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

अजित पवारांच्या निधनानंतर राजकिय वर्तुळात अनेक विषयांवर चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर आणि अनेक गोष्टींवर फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 
CM Devendra Fadanvis : "अपघाताच्या आदल्या दिवशी दादांशी तासभर गप्पा मारल्या", देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. दादांच्या निधनानंतर राजकिय वर्तुळात अनेक विषयांवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटातून अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीच्या विलानीकरणावर भाष्य केलं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाबाबत अजितदादांची इच्छा होती. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. याला दोन्ही राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांनीसुद्धा दुजोरा दिला.

हेही वाचा- Sunetra Pawar : स्वतःचे दुःख बाजूला ठेवून कर्तव्याला प्राधान्य! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिलाच दौरा; जाधव कुटुंबीयांची भेट घेणार

अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयीची सकारात्मक चर्चा झाल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. याविषयीचा निर्णय 12 तारखेलाच जाहीर होणार होता असा गौप्यस्फोट पवारांनी केला. यानंतर सुनेत्रा पवार यांनी काल उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र त्यांना अर्थखात देण्यात आलं नाही. यावरून अनेक विरोधी पक्षांनी यासगळ्यात राजकारण असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर आणि अनेक गोष्टींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

हेही वाचा- CM Devendra Fadanvis : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक, अट घालून केली राष्ट्रवादीची पंचाईत
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "काही तरी गोंधळ निर्माण करून आपल्या संस्थेचा वापर करून तो गोंधळ जनतेपर्यंत पोहचवायचा. आताच्या परिस्थितीत आम्हाला ही राजकारण करायचं नाही. नाही तर मी अनेक गोष्टी सांगू शकतो. काय घडलं आहे? काय घडतं आहे? मला सगळ दिसतंय… मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे. माझे आणि अजित दादांचे जे संबंध होते ते मला सगळ सांगायचे. त्यांचा ज्या दिवशी अपघात झाला त्याच्या आदल्या दिवशी ही आम्ही जवळपास एक तास गप्पा मारत होतो."

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version