‘मी सभागृहाची बिनशर्त माफी मागतो’ – भास्कर जाधव

‘मी सभागृहाची बिनशर्त माफी मागतो’ – भास्कर जाधव

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवाशी सत्ताधारी नेते आणि विरोधक यांच्यात जुंपत झाली. विधानसभेत शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्यामुळे विरोधकांनी विधानसभेत आवाज उठवला. याप्रकरणी आता भास्कर जाधव यांनी पंतप्रधानांच्या अवमानाप्रकरणी माफी मागितली आहे.

मी सभागृहाची बिनशर्त माफी मागतो, असे म्हणत भास्कर जाधव यांनी माफी मागितली. तसेच मी असंसदीय शब्द वापरला नसल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्याप्रकरणी हक्कभंग आणण्याचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. त्यामुळे मी कोणताही असंसदीय शब्द वापरला नसून मी हक्कभंगाला सामोरे जाण्यास तयार असल्याचेही भास्कर म्हणाले. तसेच भास्कर जाधवांनी सभागृहाची माफी मागितली.

शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्यामुळे त्यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान सहन केला जाणार नसून भास्करांना निलंबित करण्याची मागणीही फडणवीसांनी केली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी सभागृहाची बिनशर्त माफी मागितली असून कोणताही असंसदीय शब्द वापरला नसल्याचेही भास्कर म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version