‘मी तुरुंगवासाला घाबरत नाही’ – देवेंद्र फडणवीस

‘मी तुरुंगवासाला घाबरत नाही’ – देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांनी चौकशी केल्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रश्न साक्षीदाराचे नव्हते तर आरोपीसाठीचे होते. मी तुरुंगवासाला घाबरत नाही, असे वक्तव्य फडणवीसांनी विधानसभेत केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मला विचारण्यात आलेले प्रश्न साक्षीदाराचे नव्हते तर आरोपीसाठीचे होते. यापूर्वी समाजसेवा करताना माझे कटुंबीय तुरुंगात गेले आहे. माझ्या वडिलांना, काकूला विनाकारण तरुंगवास भोगावा लागला. तसेच इंदिरा गांधी यांनी गुन्हा न नोंदवता तुरुंगात टाकले. त्यामुळे मी तुरुंगवासाला घाबरत नाही.’

‘मला विचारण्यात आलेले प्रश्न वेगळे होते. मला गोवण्यासाठी प्रश्न तयार करण्यात आले असून ही प्रश्नावली कुठे बदलली ते ठाऊक असल्याचे फडणवीस म्हणाले. याप्रकरणी, आतापर्यंत २४ जणांचे जबाब नोंदविण्यात आले असून आम्ही तुरुंगवासाला घाबरणारे नाहीत तर जनतेसाठी लढणारे आहोत,’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी मुंबई बीकेसी पोलिसांनी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र, पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात न बोलवता त्यांची घरीच चौकशी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version