‘मी मोदींचाच माणूस’

‘मी मोदींचाच माणूस’

मुंबईतील अडतीस हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यासाठी गुरुवार दिनांक १९ जानेवारी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत पोहोचले. वांद्रे – कुर्ला संकुलात झालेल्या मोदींच्या सभेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणातून व्यक्त होत, मविआ सरकारला चिमटेही काढले आहेत.

‘मी मोदींचाच माणूस आहे’, असे वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वांद्रे – कुर्ला संकुलातील सभेत बोलताना केले आहे.

‘जगभरात मोदींच्या नावाचा डंका आहे, मोदींमुळे राज्य विकासाची संधी मिळाली, मोदींमुळे महाराष्ट्रात विकासकामं सुलभ झाली आहेत’, असे वक्तव्यही शिंदे यांनी वांद्रे – कुर्ला संकुलातील सभेत बोलताना केले आहे.

तसेच, मविआ काळात महाराष्ट्राचा विकास ठप्प होता, आत्ताच्या सरकारच्या कामाची काहींना पोटदुखी होत आहे, असे म्हणत शिंदेनी मविआ सरकारला चिमटे काढले आहेत.

‘सर्वसामान्यांच्या मनातील हे सरकार आहे, मुंबईचा विकास आणि चेहरामोहरा बदलणार आहे’, असेही शिंदे यांनी आपल्या भाषणात म्हटले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version