‘मी भाजपाविरोधकांना एकत्र आणतोय’

‘मी भाजपाविरोधकांना एकत्र आणतोय’

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  हे महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहणारं नाव आहे. तसेच ते राष्ट्रीय राजकारणात देखील सक्रीय असतात. सध्या ते मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्यात प्रयत्नशील आहेत. तसेच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांचे नाव चर्चेत होते. परंतु, प्रत्यक्षात आपण या आपण निवडणुकीत नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर, आता आगामी काळात लोकसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांचे नाव आता पंतप्रधान पदासाठी घेतले जात आहे. परंतु, मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. काल पुण्यात बालगंधर्व मंदिर येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हा खुलासा केला आहे.

शरद पवार यांचा राष्ट्रीय राजकारणात दबदबा आहे. विरोधकांची मोट बांधण्याकरताही त्यांच्या नेतृत्त्वाची गरज असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जर विरोधकांच्या ऐक्याला बळ मिळाले तर शरद पवार पंतप्रधानांचा चेहरा असतील, अशी चर्चा आहे. परंतु, या सर्व चर्चा शरद पवारांनी फेटाळून लावल्या आहेत.

पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मी मुळीच नाही. आम्हाला या देशात स्थिर आणि विकासाला प्रोत्साहित करणारे नेतृत्व हवे आहे. उद्या जनतेने उत्तम प्रकारची साथ दिली, त्यातून असे नेतृत्व काढू. माझ्यासारख्याची जबाबदारी आहे की अशा नेत्यांना पूर्ण साथ देणे आणि मदत देणे. मी पुढची निवडणूकच लढवणार नाहीय, मग पंतप्रधान पदाचा संबंधच येत नाही, असे शरद पवार म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version