नागपुरात नवऱ्याने पत्नीवर केला ऍसिड हल्ला

नागपुरात नवऱ्याने पत्नीवर केला ऍसिड हल्ला

नागपुरमध्ये पतीने पत्नीच्या तोंडावर ऍसिड फेकून जखमी केल्याची घटना रामेश्वरी भागात सकाळच्या सुमारास घडली आहे. आरोपी पती सुरेश झेंगटे आणि पत्नी निता असे या दाम्पत्यांचे नाव आहे. गेल्या तीन वर्षापासून त्यांच्यात वाद सुरू होता. आणि या वादामुळेच पतीने पत्नीवर दुचाकीवर येऊन ऍसिड हल्ला केला. रामेश्वरी भागातील या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

रामेश्वरी भागात पत्नी निता कामासाठी रस्त्यावरून जात  होती. त्यावेळी पतीने दुचाकीवर येत पत्नीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकले. या घटनेमुळे पत्नीची प्रकृती गंभीर झाली असून तीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहेत.

पत्नीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकून पती दुचाकीवरून फरार झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तर पोलिसांकडून फरार आरोपी पतीचा शोध सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version