शिवराज्याभिषेकासाठी शेकडो तरुण रायगडावर रवाना

शिवराज्याभिषेकासाठी शेकडो तरुण रायगडावर रवाना

राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा मंगळवारी रायगड येथे पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या उत्साहात जळगावातील हजारो शिवप्रेमी रायगडावर रवाना झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

जळगावातील चाळीसगाव तालुक्यातील आमदार मंगेश चव्हाण यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळा हा प्रत्येक नागरिकाला तरुणाला अनुभवता यावा म्हणून गेल्या अनेक वर्षापासून चाळीसगाव ते किल्ले रायगडवारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. मोफत बस उपलब्ध करण्यात येवून त्या माध्यमातून तरुणांसह नागरिकांना रायगड वारी घडवली जाते. सालाबादाप्रमाणे यंदाही चाळीसगाव ते किल्ले रायगडवारी या उपक्रमाचे आयोजन आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून करण्यात आले. गेल्या महिनाभरापासून या कार्यक्रमाची तयारी ही केली जात होती.

तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घडवा, यासाठीच या रायगडवांरी उपक्रमाचे आयोजन केलं जातं असल्याचं आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितलं. तरुण व्यसनाधीनतेपासून लांब रहावा, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तरुणांमध्ये रुजावे, त्यांनी अंगीकारावे, या उद्देशातून हा उपक्रम राबविला जात आहे, असेही यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version