हिरामण खोसकर यांची उमेदवारीसाठी धडपड

काँग्रेस आमदार हिरामण खोसकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
हिरामण खोसकर यांची उमेदवारीसाठी धडपड

नाशिक : काँग्रेस आमदार हिरामण खोसकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नुकतच आमदार खोसकर भेटले होते. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीकडे त्यांनी अर्ज केला आहे. त्यांच्या उमेदवारीवरून वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. चर्चा काहीही होत असल्या तरी काँग्रेस पक्षाकडूनच उमेदवारी करणार असल्याची भूमिका हिरामण खोसकर यांनी मांडली आहे. त्यामुळेच खोसकर यांनी २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रदेश काँग्रेस समिटीकडे अर्ज केला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version