एसटी संपावर उच्च न्यायालयात सुनावणी; शेकडो एसटी कर्मचारी मुंबईकडे रवाना

एसटी संपावर उच्च न्यायालयात सुनावणी; शेकडो एसटी कर्मचारी मुंबईकडे रवाना

एसटी महमंडळ राज्य शासनामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संप प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संपावर सुनावणी होणार असल्यामुळे शकडो एसटी कर्मचारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. तसेच एसटी महामंडळ विलिनीकरणासाठी प्राथमिक अहवाल आज सादर होणार का? या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी ३ नोव्हेंबरपासून एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलिन करण्यासाठी संप पुकारला आहे. तसेच कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्याचे आवाहन राज्य शासनाकडून सतत करण्यात आले तसेच उच्च न्यायालयाने समिती गठीत करून २० डिसेंबर रोजी प्राथमिक अहवाल सादर करण्यास सांगितला होता. याप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून सर्वांचे लक्ष न्यायालयाच्या सुनावणीकडे लागले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानंतर राज्य सरकराने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, एचआरएमध्ये वाढ केली. मात्र विलिनीकरणाच्या मागणीसाठी न्यायालयाने राज्य सरकारला समिती गठीत करण्याचे आदेश दिले होते. तसेच कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करण्यात आले. मात्र तरिही एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम असून अद्यापही कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कारवाई करत अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून अनेकांची सेवासामाप्ती करण्यात आली. तरिही कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या संपावर मुंबई उच्च न्यायालयात काय सुनावणी होणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version