मुसळधार पावसाचा मुंबईच्या जीवनवाहिनीला फटका

मुसळधार पावसाचा मुंबईच्या जीवनवाहिनीला फटका

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत गुरूवारपासून पावसाची संततधार सुरू होती. शुक्रवारी सकाळी मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर आणखीच वाढला. मुसळधार पावसाचा फटका मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल सेवेलाही बसला आहे. पावसामुळे लोकल ट्रेन १५ ते २० मिनिटं उशीराने धावत आहे. लोकल धीम्या गतीने सुरू असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर पावसाचं पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर रेल्वेच्या काही ट्रेन १०-१५ मिनिटं उशीराने धावत आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेवरील वाहतूक १० मिनिट उशिराने सुरू आहे.

मुंबईत कालपासून जोरात पाऊस कोसळत आहे. याचा थेट परिणाम लोकल वाहतूकीवर झाला आहे. दरम्यान लोकल कुठेही थांबलेल्या नाहीयत मात्र या लोकल गाड्या थोड्या उशिराने धावत आहेत.

*मध्य रेल्वेची वाहतूक १५-२० मिनिट उशिराने

*हार्बर लाईनवर वाहतूक १०-१५ मिनिट उशिराने

*पश्चिम रेल्वेवरील वाहतूक १० मिनिट उशिराने

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version