पश्चिम महाराष्ट्रात पुर परिस्थीती कायम, 16 जणांचे बळी

पश्चिम महाराष्ट्रात पुर परिस्थीती कायम, 16 जणांचे बळी

पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायमच आहे. पंचगगा नदीने पातळी ओलांडल्याने कोल्हापूरमध्ये सर्वत्र पाणी पसरले आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्यात गंभीर पुरस्थिती निर्माण झाली आहे. एक लाख 32 हजार 360 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले एसून यामध्ये 16 जणांचे बळी गेले आहेत. या तिन्ही जिल्ह्यात बचावकार्य सुरू असून अजून तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

सांगली,सातारा, कोल्हापूरमध्ये पुरपरिस्थीती गंभीर

नदीच्या पाणी पातळीत एक फुटांची घट झाली असली तरी राधानगरी धरणाचे बंद झालेले चार दरवाजे पुन्हा उघडल्याने चिंता कायम आहे. धरणातून 13000 क्युसेकने विसर्ग सुरू असून राधानगरी कणकवली रोड पुन्हा बंद झाला आहे. पावसाचा जोर वाढल्यास कोल्हापुरातील पूरस्थिती मध्ये अजून वाढ होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरस्थितीची पाहणी करणार आहे.

सकाळी नौदलाच्या दोन विमानातून एका बोटींसह २२ जणांचे पथक आणि गोवा कोस्टगार्डचे एक हेलिकॉप्टर बोटीसह कोल्हापुरात आले असून सकाळपासूनच एनडीआरएफ आणि लष्कराच्या जवानांनी बोटीद्वारे पूरग्रस्तांना मदत देण्यास सुरुवात केली आहे. पुरात अडकलेल्या अनेकांना सुरक्षा स्थळी हालवण्यात आले आहे.

कराडची पूर परस्थिती जैसे थे असून शहरातील पाणी कालपासून पातळीत वाढ अथवा कमीही झाली नाही.कराडच्या आसपासचा भागही पाण्याखाली गेला असुन तेथेही पाणी भरुन राहिले आहे. कोयनेतील संपर्क यंत्रणा कालपासुन बंद असुन पुणे बेंगलोर हायवे अजुनही बंदच आहे. पाऊसाची रिपरिप सुरुच आहे.सातारा जिल्ह्यातील बिकट पुर परिस्थिती असून तांबेगाव तालुक्यामध्ये एनडीआरएफच्या टिमने केला लोकांचा बचाव केला आहे.
सातारा जिल्ह्यातील एकुण 269 लोकांना रेस्क्यु करण्यात आले आहे.

सांगलीसह नदीकाठी हजारो नागरिक पुरात अडकले आहेत. सांगलीच्या गावभाग मध्ये नगरसेविकेसह 1000 जण अडकले आहेत. मदतकार्यासाठीच्या बोटीही पडल्या बंद आहेत. कसबे डिग्रजच्या कदमवाडी मध्ये १० ते १२ जण एका घरात अडकले आहेत. आनेकांच्या घराला पुराने वेढा घातला असून पाणी वाढत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. प्रशासनाची अप्पती यंत्रणा कोलमडली आहे. यंत्रणेचे नागरिक मदतीसाठी देण्यात आलेले काही मोबाईल बंद आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version