एसटी संपावरील सुनावणी पुढे ढकलली

एसटी संपावरील सुनावणी पुढे ढकलली

राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते गैरहजर राहिल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे.

सुनावणी दरम्यान, एसटी महामंडळाच्या वकिलांनी युक्तीवाद करताना म्हटले की, औद्योगिक न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरवून सुद्धा निर्णय देऊन पण संप मागे घेण्यात आला नाही. तसेच याचिका मागे घेत आहोत असा युक्तीवाद न्यायालयात करण्यात आला. तसेच याप्रकरणी पुढील सुनावणी बुधवारी १०.३० वाजता होणार आहे.

एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी कर्माचारी संपावर गेले आहे. गेल्या पाच महिन्यांहून अधिक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारने एसटीचे विलिनीकरण शक्य नसून संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, संपकारी कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. या आंदोलनादरम्यान, अनेक कर्मचाऱ्यांवर बडतर्फी तसेच निलंबनाची कारवाई राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. तर अनेक कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात आत्महत्यादेखील केल्या आहे.

मनपासमोर  एसटी कर्मचारी आक्रमक

दरम्यान, मूलभूत सुविधांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी सोमवारी मुंबई महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली. राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणींवर दुर्लक्ष करत आहेत. कर्मचाऱ्यांना अंघोळ, शौचालयाची गैरसोय होत असल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी मनपासमोर ठिय्या आंदोलन केले. तर या आंदोलनात अनेक महिला कर्मचारी सहभागी झाले होते.

एसटी संपामुळे प्रवाशांचे हाल

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लालपरी रस्त्यावर धावत नाही आहे. राज्यात अनेक ठिकाणी एसटी बस बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवाशांना प्रवास करण्यासाठी इतर खाजगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. तसेच हे वाहनचालक प्रवाशांकडून कमी अंतराच्या प्रवासासाठीदेखील जास्तीचे पैसे आकारत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खीशाला कात्री लागत आहे. तसेच जोवर विलिनीकरण होत नाही, तोवर एसटी कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version