धुळ्यातील हरीश साळवे बनले ब्रिटनच्या महाराणीचे सल्लागार

धुळ्यातील हरीश साळवे बनले ब्रिटनच्या महाराणीचे सल्लागार

कायदा आणि वकिलीच्या क्षेत्रात महत्त्वाची आणि मोठी कामगिरी करणाऱ्या वकिलाला थेट ब्रिटनच्या महाराणीचे वकिल म्हणून निवड केली जाते. यात आता भारतातील मराठमोळे वकील हरीश साळवे यांची वर्णी लागली आहे.

आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे आता ब्रिटनच्या महाराणीचे सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत.

ही भारतासाठी खुप मोठी गोष्ट आहेच. मात्र साळवे हे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील असल्याने ही महाराष्ट्रासाठी महत्वाची गोष्ट आहे.

१६ मार्च रोजी हरीश साळवे यांची अधिकृतपणे नियुक्ती होणार असून ते कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे ‘क्वीन काऊंसिल’ म्हणून काम पाहणार आहेत. आंतरराष्ट्रीय कोर्टात कुलभूषण जाधव यांच्याबद्दलचे योगदान महत्वाचे आहे.

हरिश साळवे यांच्याबद्दल…
हरिश साळवे यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील वरूड गावात झाला आहे. वकिल होण्याआधी साळवे यांचे CA पर्यंतचे शिक्षण झाले आहे.

प्रसिद्ध वकील नानी पालखीवाला यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि त्यांनी वकिलीची डिग्री मिळवली. 1992 मध्ये हरिश साळवे सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकिल बनले.

१९९९ मध्ये सॉलिसिटर म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांचे आजोबा पी. के. साळवे क्रीमिनिल लॉयर होते.साळवे यांचे पणजोबाही न्यायाधीश होते. तर हरीश साळवेंचे वडील वडील एन. के. पी. साळवे हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते.

हरिश साळवे हे एका दिवसाचे 25-30 लाख रूपये मानधन आकारतात. हरीश साळवे यांनी फक्त एक रूपयांचं मानधन घेऊन कुलभूषण जाधव यांची बाजू आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version