‘ज्ञानवापी मशीद सर्वेक्षण होणार’

‘ज्ञानवापी मशीद सर्वेक्षण होणार’

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाप्रकरणी वाराणसी न्यायालयाने निर्णय दिला आहे. ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण होणार असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. तसेच ज्ञानवापी मशीद सर्वेक्षणाचे अधिकारी बदलणार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण होणार असून १७ मेच्या आधी मशिदीचे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच सर्वेक्षण करताना कुठलीही बाधा येणार नाही याची दक्षता घेण्याचेही न्यायालयाने सांगितले आहे.

ज्ञानवापी मशीद प्रकरणी न्यायालयाने काय म्हटलंय?

  • ज्ञानवापी मशीद परिसराचे सर्वेक्षण होणार.
  • ज्ञानवापी मशीद परिसराचे कसून मोजमाप घ्या.
  • ज्ञानवापी मशिदीचे तळघर उघडा.
  • ज्ञानवापी मशीद सर्वेक्षणाचे अधिकारी बदलणार नाही.
  • ज्ञानवापी मशीद सर्वेक्षण १७ मेच्या आधी पूर्ण करा.

ज्ञानवापी मशीद परिसरात ७ मेपासून सर्वेक्षणाचे काम सुरू होते. मात्र, यावेळी हिंदू आणि मुस्लिमांकडून घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, आता ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करण्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. तसेच सर्वेक्षण परिसरात न्यायालयाने कडेकोट बंदोबस्त सुनावला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version