पुणे रेल्वे स्थानकावर गुंडाराज

पुणे रेल्वे स्थानकावर गुंडाराज

पुणे, ५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर दोघांची फ्री स्टाईल हाणामारी सुरू होती. ही हाणामारी एवढी भयानक होती की ती पाहिल्यावर साऊथच्या एखाद्या अॅक्शन चित्रपटातील पात्रांनाही लाजवेल. या प्रकारामुळे पुणे रेल्वेस्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.अशा घटना अनेक वेळा इथे घडल्या आहेत. यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली असून, प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचे तीन-तेरा वाजले असून, स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरच ‘गुंडाराज’ सुरू असल्याचे दिसत आहे. यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली असून, प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. सध्या पुणे रेल्वे स्थानकाची सुरक्षा म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच झाली आहे. या रेल्वे स्थानकापेक्षा नव्याने शहरात तयार झालेल्या मेट्रो स्थानकाची सुरक्षा मजबूत असल्याचे दिसते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आगामी काळात घडणारी अनुचित घटना टाळण्यासाठी आत्ताच ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे, अन्यथा अनेक जिवांना आपले प्राण गमवावे लागणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version