दिल्लीत सुरु असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी तसेच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एकत्रित महामोर्चाचे आयोजन केले आहे. नीट पेपरफुटीविरोधात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा देत येत्या 26 जुलैला ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा शिवाजी पार्क येथून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे.
हा मोर्चा राजकीय अजेंड्यापलीकडे असणार असून यामध्ये कोणत्याही पक्षाचे ध्वज न वापरता फक्त राष्ट्रध्वज तिरंगा हाती घेतला जाईल, असे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात पक्षाचे भेद विसरून सर्व विद्यार्थी, पालकांनी तसेच महाविकास आघाडीतील शरद पवारांपासून अगदी देवेंद्र फडणवीसांपर्यंत सर्वांनीच सहभागी व्हावे, असे खुले आवाहन ठाकरेंनी केले. दरम्यान ठाकरेंच्या दादर येथील आंदोलनावरून शिवसेना शिंदे गटातील नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
ठाकरेंनी म्हटलं म्हणजे चांगलीच गोष्ट
यावेळी गुलाबराव पाटील यांनी म्हटलं की, "चांगलं आहे, आपण या देशाचे नागरिक आहोत, तिरंगा आपला आहे, राष्ट्रगीत पण आपले आहे ते सर्वांनी म्हटलं पाहिजे… ठाकरेंनी म्हटलं म्हणजे चांगलीच गोष्ट राहणार आहे.. ज्या पक्षांना प्लॅटफॉर्म नाही ते पक्ष या आंदोलनाच्या निमित्ताने संधी साधून घेत आहे… या प्रकरणात विद्यार्थ्यांना न्याय मिळेल याच्या करता न बोलता, फक्त आंदोलन काढून अस्तित्व दाखवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय या संदर्भात सरकार समजून घेत आहे, सरकार देखील चर्चा करायला तयार झालं आहे."
दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रात विद्यार्थ्यांचे आंदोलन
"अभिजित दीपकेंची समजूत देखील सरकारने काढली पाहिजे.. सरकार त्यांची समजूत काढेल असं मला वाटतं आहे. बीशेवटी ते विद्यार्थी आहे देशाचे भावी नागरिक आहे.. सरकारमध्ये काही चुका होत असतात.. या चुका दुरुस्त करण्यासंदर्भात सरकार निश्चितच आश्वासन देईल. आपल्या देशाचे होणारे भावी नागरिक त्यांच्या पाठीवरून हात फिरून म्हणा किंवा त्यांना बोलवून म्हणा.. पुढच्या काळामध्ये निर्णय होतील असं मला वाटतं आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधला आता सुरुवात झाली आहे.. सोनम वांगचुक यांच्याशी संवाद झाला आहे विद्यार्थ्यांचे देखील संवाद होऊ शकतो. संवादानेच या गोष्टी सुटू शकतील त्यामुळे सरकारने देखील दोन पावलं पुढे चालले पाहिजे . शेवटी आपल्याला विद्यार्थ्यांच्या जीवनाला न्याय द्यायचा आहे.."
"मुंबई पोलिस आंदोलकर्त्यांना जी वागणूक देत आहेत असं जर होत असेल तर चुकीचं आहे, या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितला आहे की आपण चौकशी करू. शेवटी आंदोलन करणारे आहेत त्यांना समजून घेतलं पाहिजे.. शेवटी शिवसेना असेल किंवा भाजप असेल हे पक्ष आंदोलनातूनच पुढे आले आहेत.. शेवटी एका काळामध्ये आपण देखील आंदोलन करत होतो याचा विषय कोणाला पडू नये. अशी प्रत्येकाला अपेक्षा असते. आम्हालाही तो विसर पडणार नाही, अशी आम्हाला खात्री आहे."
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.