दैवाने हिरावले दोन्ही हात, पायांनी दिले बळ

दैवाने हिरावले दोन्ही हात, पायांनी दिले बळ

ही कहाणी आहे अश्या मुलाची जे पाहून सर्वांना आपल्या आयुष्याचे संघर्ष फार छोटे वाटतील. घरात अठरा विश्व दारिद्रय, चारही बाजूंनी प्रतिकूल परिस्थिती मात्र, खचून न जाता व परिस्थितीचा बाऊ न करता ध्यैर्याने आणि जिद्दीने शिक्षण घ्यायचे आणि वडीलांच्या छायेत ध्येय गाठायचे असा निर्धार केलाय आठ वर्षाच्या दोन्ही हातांनी दिव्यांग असलेल्या गणेशने केलाय. हात नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा गणेश पायाने अक्षरे गिरवित असून इतर मुलांसारखेच तो शिक्षण घेत आहे. शिक्षणासाठी असलेली त्याची धडपड आणि जिद्द पाहून अनेकजण अचंबित होत आहेत. शहादा तालुक्यातील असलोद या छोट्याशा गावातील गणेशची हि संघर्षगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

आठ वर्षांचा गणेश माळी हा जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता दुसरीत शिकतो. जन्मापासूनच त्याचे दोन्ही हात नाहीत. तरी त्यांची शिक्षणासाठीची लढाई कमी झालेली नाही. त्याचे पालन पोषणाची जबाबदारी वडीलच सांभाळत आहेत. गणेशला हात नसल्याने वयाच्या अवघ्या आठव्यावर्षी तो पायाने अक्षर गिरवित आहे. पायानेच तो मोबाईलदेखील सहजरीत्या पायाने हाताळतो. शिक्षणासोबत खेळातील त्याची आवड आणि मैदानातील त्याची चपळता भल्याभल्यांना अवाक करणारी आहे. वडील मोलमजुरी करुन कसाबसा कुटुंबाचा गुजरा करत आहेत.आजी आजोबांच्या देखरेखीखाली राहणाऱ्या गणेशला शासन स्तरावरुनच कृत्रिम अवयवांसाठी आणि त्यांच्या जीवनाच्या लढाईसाठी मदतीची अपेक्षा अनेकांकडून करण्यात येत आहे.

गणेश पायाने लिखाण व इतर क्रिया सहज करत असला तरी जेवण आणि काही गोष्टींसाठी त्याला इतरांवर अवलंबून राहावे लागते. यातून बराच वेळा शेजारी काही ग्रामस्थ मदत करतात. असलोद ग्रामस्थांनी राज्यातील सामाजिक संस्था आणि राजकीय नेत्यांकडे गणेशाच्या समस्येबाबत पाठपुरावा केला आहे. यामुळे, त्याला लवकरच कृत्रिम हात मिळतील अशी आशा आहे.

सरकारने पुढे येवुन त्याच्यासाठी कृत्रिम अवयवांचा बंदोबस्त करुन दिल्यास आणि त्याला शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ दिल्यास गणेश आगामी काळात इतरांसांठी प्रेरणादायी लढाच ठरेल, यात शंका नाही !

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version