गेल्या महिन्याभरापासून गणपतीची लगबग सुरू असून देशभर या उत्सवाला सुरुवात झाली आहे. मोठ्या जल्लोषात भाविकांनी मुंबईतील प्रसिद्ध गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. सकाळपासून सगळीकडे प्रसन्न आणि उत्सवाचे वातावरण आहे. मुंबईतील गणेश गल्ली, लालबागचा राजा, चिंतामणी, जीएसबी या ठिकाणी भाविकांनी सकाळपासून रांगा लावत गर्दी केली आहे. तसेच पुण्यातील पाच मानाच्या गणपतींचे आगमन सोहळा पार पडला आहे.
राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून गणेशोत्सवच्या शुभेच्छा –
देशभरात गणपतीच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे.
मुंबईतील गणेश गल्ली, लालबागचा राजा, चिंतामणी, जीएसबी गणपतींचे आगमन झाले आहे.
पुण्यातील पाच मानाच्या गणपतींचे मिरवणूक काढून आगमन सोहळा पार पडला आहे.
त्याचबरोबर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशोत्सावाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गणपती बाप्पा मोरया !
गणेश चतुर्थीच्या सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा व शुभकामना. भगवान गणेशाच्या कृपेने सर्वांना सुख,शांती व समृद्धी लाभो या सदिच्छा.
— President of India (@rashtrapatibhvn) September 2, 2019
सर्वांना सुख, शांती आणि समृद्धी लाभावी अशी शुभेच्छा दिल्या आहेत.
सभी देशवासियों को पावन पर्व गणेश चतुर्थी की ढेर सारी शुभकामनाएं। गणपति बाप्पा मोरया!
Wishing everyone a blessed Ganesh Chaturthi.
— Narendra Modi (@narendramodi) September 2, 2019
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.