…म्हणून घरासमोरच केले अंत्यविधी

…म्हणून घरासमोरच केले अंत्यविधी

इगतपुरी, २२ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : नाशिक जिह्यातील इगतपुरी तालुक्यात धक्कादायक घटना घडली. इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन गावात एका महिलेच्या मृत्यूनंतर घरासमोरच अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानाकडे जाण्यासाठी रस्ता नाही म्हणून घरासमोरच अंत्यसंस्कार करण्यात आले.

उंबरकोन गावातील ध्रुपदाबाई सारुक्ते यांचा मृत्यू झाला. पण स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता स्थानिक शेतकऱ्याने बंद केला होता. यामुळे स्मशानाकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नव्हता. अशातच पाऊस सुरू झाला. अखेर ध्रुपदाबाई सारुक्ते यांच्या पार्थिवावर घरासमोरच अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानाच्या जवळच शेती असल्याने स्थानिक शेतकऱ्याने रस्ता बंद केला. याच कारणामुळे ग्रामस्थांची पंचाईत झाली आहे. आता प्रशासनाने तोडगा काढावा आणि स्मशानापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी स्थानिक करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version