लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला?

लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला?

महाविकास आघाडीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत तिन्ही पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीचा फॉर्म्युला तयार केला असल्याची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे. तिन्ही पक्षांनी महाराष्ट्रात प्रत्येकी १६ जागा लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.

ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अद्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवसास्थानी झाली होती. या बैठकीला उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना याबाबत प्रश्न विचारल्यावर आव्हाड म्हणाले. ‘मला काहीच माहिती नाही.’ ‘मी त्या बैठकीत आंधळा, मुका आणि बहिरा होतो.’

जयंत पाटील म्हणाले,
आम्ही सध्या कोणताही फॉर्म्युला तयार केलेला नाही. प्रत्येक मतदारसंघात ज्यांची जिथे जास्त ताकद आहे तिथे त्या पक्षाला प्राधान्य देऊ. तिन्ही पक्ष आणि इतर घटक पक्ष ज्यांनी महाविकास आघाडीला २०१९ मध्ये पाठिंबा दर्शवला होता. त्यांना विश्वासात घेतलं जाईल. सर्वांशी चर्चा केली जाईल आणि आम्ही तिकीट वाटपाची तयारी आम्ही सुरू केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version