पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा

पेशावर : पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख आणि माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानातील विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

परवेज मुशर्रफ यांच्यावर डिसेंबर 2013 मध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी मागील सहा वर्षांपासून सुनावणी सुरु होती.

परवेज मुशर्रफ संविधानाचा भंग केल्याने तसेच 2007 मध्ये आणीबाणी जाहीर केली होती. आणीबाणीचा निर्णय चूक असल्याचा आरोप केला होता. यामुळेच मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता.

पाकिस्तान सरकारच्यावतीने इस्लामाबादेतील त्रिसदस्यीय विशेष न्यायालयाकडे मुशर्रफ यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version