माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक

  राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. अनिल देशमुख यांची १३ तासांच्या चौकशीनंतर ईडीने कारवाई करत देशमुखांना अटक केली आहे. गेल्या अनेक दिवासांपासून बेपत्ता असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख काल ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. ईडीने अनिल देशमुख यांची १३ तासांची कसून चौकशी करत देशमुखांवर कारवाई केली आहे.

  अनिल देशमुखांना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात वरिष्ठ वकील विक्रम चौधरी यांच्यासोबत ॲड. अनिकेत निकम देशमुखांच्यावतीने युक्तीवाद करणार आहेत. तसेच अनिल देशमुख यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुली प्रकरणी अनेक आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीने देशमुखांना समन्ससुद्धा बजावले  होते. मात्र देशमुख ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले नाही. देशमुखांच्या घरी, कार्यालयांवर ईडीने अनेकदा छापेही टाकले आहेत. मात्र देशमुख चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. आपल्यावरील कारवाई रद्द करण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. आणि इतके दिवस बेपत्ता असलेले अनिल देशमुख काल ईडी कार्यालयात हजर झाले. आणि अखेर देशमुखांची कसून चौकशी करत सक्तवसुली संचालनालयाने देशमुखांना अटक केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version