तिरोडा बाजार समितीच्या माजी सभापतींनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. विष प्रश्न केल्याची माहिती मिळाली आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती चिंतामण रहांगडाले यांनी आपल्या राईस मिलच्या गोडाऊनमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. चिंतामण रहांगडाले हे शुक्रवारी संध्याकाळी घरी परत न आल्याने घरच्या लोकांनी आणि नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तरीही त्यांचा थांग पत्ता लागला नाही. त्यामुळे कुटूंबियांनी तिरोडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. शनिवारी सकाळी मिल मध्ये जाऊन पाहणी केली असता गोडाऊनमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी रहांगडाले यांचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणी करिता तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. तसेच, तिरोडा पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.