गुजरातच्या वंताराच्या धर्तीवर महाराष्ट्रात सूर्यतारा बांधण्याचा विचार; वनमंत्र्यांचे अनंत अंबानींना पत्र

महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटलं आहे की, गुजरातमधील वंताराच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रात सूर्यतारा बांधण्याचा विचार करत आहे.
गुजरातच्या वंताराच्या धर्तीवर महाराष्ट्रात सूर्यतारा बांधण्याचा विचार; वनमंत्र्यांचे अनंत अंबानींना पत्र
Edited Image

नागपूर: महाराष्ट्रातील वन मंत्रालय गुजरातमधील वंताराच्या धर्तीवर राज्यात सूर्यतारा बांधण्याचा विचार करत आहे. महाराष्ट्राच्या वनमंत्र्यांनी अनंत अंबानी यांना पत्र लिहून त्यांची योजना स्पष्ट केली आहे. प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र सरकार ठाण्यात सूर्यतारा बांधण्याचा विचार करत आहे. महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटलं आहे की, गुजरातमधील वंताराच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रात सूर्यतारा बांधण्याचा विचार करत आहे. वनतारामध्ये जगभरातील अनेक जखमी आणि आजारी प्राणीची देखभाल केली जाते. 

वनमंत्र्यांचे अनंत अंबानी यांना पत्र – 

दरम्यान, महाराष्ट्राच्या वनमंत्र्यांनी अनंत अंबानी यांना पत्र लिहिले असून यात पत्रात त्यांनी म्हटले आहे की, ज्या प्रकारे गुजरातमधील जामनगरमध्ये वंतारा बनवला गेला, त्याच प्रकारे महाराष्ट्रात सूर्यतारा बनवला पाहिजे. सूर्यतारा प्रकल्प महाराष्ट्रातील ठाणे येथून सुरू होईल. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात वंतारा, सूर्यतारा आणि इतर सर्व तारे निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती गणेश नाईक यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली. 

हेही वाचा – Maharashtra Weather Update April 11: नागपूरसह 'या' जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा

गणेश नाईक यांनी सांगितले की, गुजरातमधील वंतारा सारख्या वन्यजीव अभयारण्य आणि बचाव केंद्रावर लवकरच काम सुरू केले जाईल. राज्य सरकार या प्रकल्पाचे नाव सूर्य तारा ठेवण्याचा विचार करत आहे. गेल्या काही महिन्यांत वाघांचे सतत मृत्यू होत आहेत, परंतु वाघांच्या मृत्यूचे कोणतेही एकच कारण नाही. काही वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाला, तर काही वाघ एकमेकांशी लढाई करताना जखमी झाले आणि मृत्युमुखी पडले. 

हेही वाचा – दाऊदला भारतात का आणलं नाही? विजय वडेट्टीवार यांचा रोखठोक सवाल

वनताराची वैशिष्ट्ये – 

वंतारा हे 3 हजार एकरमध्ये पसरलेले आहे, जे पूर्वी रिलायन्स रिफायनरीचा भाग होते. ते वन्यजीवांसाठी एक नैसर्गिक आणि पोषक अधिवासात रूपांतरित झाले आहे, जिथे प्राण्यांना त्यांच्या मूळ वातावरणासारखे वातावरण मिळते. हे 2000 हून अधिक प्रजाती आणि 15 लाखांहून अधिक प्राण्यांचे घर आहे. वनतारामध्ये जखमी, शोषित किंवा अनाथ प्राण्यांच्या बचाव, उपचार आणि पुनर्वसन केले जाते. 

वंतारामध्ये हत्ती, सिंह, बिबट्या, मगरी, साप आणि पक्षी यासह अनेक प्रजातींचे संगोपन केले जाते. जैवविविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी हा एक अनोखा प्रयत्न आहे. वनतारामध्ये जागतिक दर्जाची पशुवैद्यकीय केंद्रे, पुनर्वसन सुविधा आणि संशोधन केंद्रे आहेत, जी प्राण्यांच्या आरोग्याला आणि कल्याणाला प्राधान्य देतात. वनतार म्हणजे 'जंगलाचा तारा', जो सर्व सजीव प्राण्यांबद्दल सहानुभूती आणि आदराचे भारतीय तत्वज्ञान प्रतिबिंबित करतो. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version